Donate
27 Nov, 2025
उष्णलाटांकडून शीतलतेकडे वतावरणीय बदल उपायांसाठी महाराष्ट्राचे नेतृत्व

By AIDMI, India

 

Southasiadisasters.net चा हा अंक वातावरणबदलामुळे भारतासमोरील सर्वात गंभीर आव्हानांपैकी एक असलेल्या तीव्र उष्णतेला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्राने घेतलेले नेतृत्व अधोरेखित करतो.

या अंकात संरचना, विज्ञान, समुदाय लवचिकता आणि प्रशासनाला जोडणाऱ्या विविध नवोन्मेषी आणि स्थानिक अनुभवावर सिद्ध झालेल्या उपाययोजना सादर केल्या आहेत. UNICEF च्या नागपूरमधील योग्य खर्चातील व परिणामकारक “ग्रीन प्रोजेक्ट” व तसेच AIDMI आणि IIED यांच्या अभ्यासातून कापूस शेतकऱ्यांच्या उपजीविकेशी उष्णतेविरोधी लवचिकतेचा अनुभव सादर करण्यात आला आहे. या अंकातील प्रत्येक लेख स्थानिक स्तरावरील उपाय कसे ठोस परिणाम घडवतात हे दर्शवतो.

सदरील अंकात लेखकांनी शहरी उष्णता, उष्णता लवचिकतेसाठी प्रशासनातील सुधारणा, बायोमिमिक्री व पारंपरिक वास्तुशैली, समुद्रावर आधारित शीतकरण नवकल्पना, तसेच झोपडपट्ट्या आणि शेतांतील समुदाय-नेतृत्वाखालील रूपांतर याबद्दल विविध दृष्टिकोन मांडले आहेत. एकत्रितपणे, हे दृष्टिकोन दाखवतात की थंडकरण हे चैनीचे साधन नसून ते आरोग्य, उत्पादकता आणि समानतेची जीवनरेखा आहे.

कृषी, गृहनिर्माण आणि आपत्ती व्यवस्थापन यांसह संरचणा, उपजीविका, सेवा, आणि सुशासन इत्यादि सर्व क्षेत्रांमध्ये उष्णता-लवचिकता मुख्य प्रवाहात आणण्याचे आवाहन आहे. स्थानिक प्रयोगांना राज्यव्यापी उपक्रमांत रूपांतरित करून, महाराष्ट्र भारताचा पहिला “Cooling Transition” साध्य करू शकतो. पारंपरिक ज्ञान, तांत्रिक नवकल्पना आणि नागरिक नेतृत्व एकत्र येऊन वाढत्या उष्णतेपासून  जीवन व हवामान सुरक्षित करू शकतात.

हा अंक विज्ञान, एकात्मता आणि शाश्वततेच्या आधारे लवचिकता निर्माण करण्याची मार्गदर्शक ठरू शकतो.

Read more

Subscribe to Our Newsletter

Join our mailing list to stay up to date on all
The latest news and events from AIDMI

Subscribe to our Newsletter!